19 February, 2019

 शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती,
 येथे छञपती शिवाजी महाराज जयंती साजरी

दि.19/02/2019, मंगळवार रोजी शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, मूर्ती.ता.घनसावंगी जि.जालना.येथे छञपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक श्री सुनिल खरात यांची उपस्थिती होती. सुरुवातिला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी छञपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्राथमिक गटासाठी '-छञपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य' आणि माध्यमिक गटासाठी- 'छञपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला संघर्ष आणि महाराष्र्टाची जडणघङण' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. 
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुनिल खरात यांनी 'छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व कार्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव सोळंके यांनी छञपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जीवन व कार्याविषयी मार्गदर्शन केले.या वेळी घेण्यात आलेल्या वक्त्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटातून सर्वप्रथम कु.शिंदे कोमल मोहन (6 वी) द्वितीय शिंदे शिवराज बालासाहेब तर माध्यमिक गटातून कु.गोरे निकिता वामन (9वी ब),द्वितीय कदम रवी गणेशराव (10 वी)यांचा क्रमांक आला.  या कार्यक्रमाचे सुञसंचलन कु.उगले भावना हिने केले तर कु.गितांजली देवकर हिने आभार व्यक्त केले.


छत्रपती  शिवाजी महाराज यांची जयंती 
उत्साहात साजरी.

     दिनांक 19 फेब्रुवारी 2019 वार मंगळवार रोजी शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा  कुं. पिंपळगाव ता.घनसावंगी जि.जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
    या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री चव्हाण प्रदिप हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री कऱ्हाडे विनोद हे होते. व विनायक कदम  हे उपस्थित होते. यावेळी सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली . 
    त्यानंतर शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चव्हाण प्रदीप यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बहुमूल्य मार्गदर्शन केलेे. 
तसेच यावेळी  शिक्षक श्री शिंदे विष्णू, श्री खिस्ते निळकंठ, श्री सांगळे दीपक, श्री साबळे भगवान, श्री वाघमारे सहदेव, यावेळी उपस्थित होते  विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते. तसेच शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवचार मोहन यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री काळे विजय कुमार यांनी मानले .