छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
उत्साहात साजरी.
दिनांक 19 फेब्रुवारी 2019 वार मंगळवार रोजी शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा कुं. पिंपळगाव ता.घनसावंगी जि.जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री चव्हाण प्रदिप हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री कऱ्हाडे विनोद हे होते. व विनायक कदम हे उपस्थित होते. यावेळी सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली .
त्यानंतर शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चव्हाण प्रदीप यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बहुमूल्य मार्गदर्शन केलेे.
तसेच यावेळी शिक्षक श्री शिंदे विष्णू, श्री खिस्ते निळकंठ, श्री सांगळे दीपक, श्री साबळे भगवान, श्री वाघमारे सहदेव, यावेळी उपस्थित होते विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते. तसेच शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवचार मोहन यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री काळे विजय कुमार यांनी मानले .
