शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती,
येथे छञपती शिवाजी महाराज जयंती साजरी
दि.19/02/2019, मंगळवार रोजी शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, मूर्ती.ता.घनसावंगी जि.जालना.येथे छञपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक श्री सुनिल खरात यांची उपस्थिती होती. सुरुवातिला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी छञपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्राथमिक गटासाठी '-छञपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य' आणि माध्यमिक गटासाठी- 'छञपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी केलेला संघर्ष आणि महाराष्र्टाची जडणघङण' या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुनिल खरात यांनी 'छञपती शिवाजी महाराज यांच्या जीवन व कार्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव सोळंके यांनी छञपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जीवन व कार्याविषयी मार्गदर्शन केले.या वेळी घेण्यात आलेल्या वक्त्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटातून सर्वप्रथम कु.शिंदे कोमल मोहन (6 वी) द्वितीय शिंदे शिवराज बालासाहेब तर माध्यमिक गटातून कु.गोरे निकिता वामन (9वी ब),द्वितीय कदम रवी गणेशराव (10 वी)यांचा क्रमांक आला. या कार्यक्रमाचे सुञसंचलन कु.उगले भावना हिने केले तर कु.गितांजली देवकर हिने आभार व्यक्त केले.

No comments:
Post a Comment