18 February, 2019

शरदचंद्रजी पवार उच्च माध्यमिक विद्यालय कुं.पिंपळगाव येथे 
इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

दि.14 फेब्रुवारी रोजी शरदचंद्रजी पवार उच्च माध्यमिक विद्यालय कुं.पिंपळगाव येथे शैक्षणिक वर्ष 2018 - 19 मधील इयत्ता 12 वी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा व निरोप देण्यात आला.
        या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र तौर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या सचिव सौ. किरणताई तौर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनोद कऱ्हाडे, विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव सोळंके, रामेश्वर आर्दड, प्रदीप चव्हाण,विनायक कदम,भगवान तौर,विठ्ठल थेटे,याची उपस्थिती होती.
         यावेळी इयत्ता 12 वी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष,रविंद्र तौर, सचिव  किरणताई तौर यांचे 10 वी नंतरच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या मनोगतात आभार व्यक्त केले तसेच विद्यालयाबद्दल व शिक्षकांचाही गुणगौरव केला. या प्रसंगी कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून लाभलेले विद्यालयाच्या सचिव सौ. किरणताई तौर, प्रशासकीय अधिकारी विनोद कऱ्हाडे, विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव सोळंके,यांनी आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना एस सी बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन भावी जीवनासाठी मार्गदर्शन केले.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र तौर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे व शिक्षकांचे स्वप्न साकार करावे.जीवनात धडपड, जिद्द,चिकाटी व परिश्रम करण्याची  सवय ठेवावी. शिस्त आणि शिष्टाचार अंगी बाळगावा.चारित्र्य आणि नैतिकतेचे पालन करावे. मोबाईल,इंटरनेट,व्हॉटस् अप, फेसबुक इत्यादीचा वापर गरजेपुरताच करावा. अपयश पचविणे शिकावे. अवांतर वाचन, संभाषण कौशल्य, नेतृत्वगुण, इत्यादी गुण विकशीत करावे. असे अमुल्य मार्गदर्शन करून शूभेच्छा दिल्या.
         कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देवकर सुरेश यांनी केले तर आभार उपाध्ये के.के. यांनी मानले.