28 July, 2020



इयत्ता 10 वी चा निकाल मंडळाच्या खालील लिंक वर उपलब्ध आहे.



👇




ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले आभार !

16 July, 2020


12 वी चा निकाल मंडळाच्या खालील लिंक वर उपलब्ध आहे









ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले आभार!

27 September, 2019


मतदार यादीतील आपले नाव व इतर माहिती शोधा 


माहिती बघण्यासाठी खालील लिंक ला टच करा 



07 September, 2019

"पाऊलखुणा" 
शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती ता.घनसावंगी जि. जालना  येथे संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्रतात्या तौर यांच्या शुभहस्ते आज दिनांक 07 सप्टेंबर 2019 शनिवार रोजी वृक्षारोपण करण्यात आले.सदरील वृक्षांची रोपे "पाऊलखुणा" या उपक्रमांतर्गत कृषि विज्ञान केंद्र खरपुडी ता.जि. जालना यांच्या मार्फत पुरविण्यात आली होती.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


09 March, 2019

मा.आ.श्री.राजेशभैय्या टोपे साहेब 
यांचे हस्ते शरदचंद्रजी पवार विद्यालय मूर्ती येथे 
         मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न              

     दिनांक 08 मार्च 2019 शुक्रवार रोजी मुलींना"मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल वाटप कार्यक्रम माननीय आमदार राजेशभैय्या टोपे साहेब (माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री रविंद्रतात्या तौर (अध्यक्ष सुर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ कु.पिंपळगांव) हे होते.माननीय राजेशभैय्या टोपे यांनी आपल्या भाषणात- नैतिक शिक्षणाचे महत्त्व सांगून कुठल्याही परिस्थितीत सर्वांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन जीवनात उच्चध्येय गाठावे असे सांगून महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्रतात्या तौर यांनी ही दर्जेदार शाळा निर्माण करून परिसरातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय निर्माण करून दिल्याबद्दल व शाळेतील विद्यार्थी,शिस्त,शिक्षकांची मेहनत,अंतर्गत व्यवस्थापन अत्यंत चांगले ठेवल्याबद्दल श्री रविंद्रतात्या तौर यांचे अभिनंदन केले व शाळेच्या पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या.
     या कार्यक्रमास पं.स.समिती सदस्य सुशील तांगडे,प्रकाशराव तौर,महेंद्र तौर,शरदराव सोळंके,नितीन तौर, मधुकरराव ढवळे,अमर तौर,भागवतराव सोळंके, सुरेशराव शिंदे,मनोज शिंदे,मदनराव शिंदे,कैलासभैय्या तौर,हनुमंत देवकर,कमलेश तौर,गणेश तौर,महेश वाघमारे,प्रल्हाद जाधव,लक्ष्मणराव सोळंके, तुकाराम सोळंके, कैलासराव सोळंके,संभाजी तौर,निलेश वाघमारे,उत्तमराव देवकर,राजेभाऊ पितळे, भागवत चकवे,लक्ष्मणराव कोरडे,राजकुमार वायदळ,लक्ष्मीकांत कुलकर्णी (पत्रकार दै. सकाळ),मनोहर वागदरे, विलासराव धनवे, मधुकरराव कवचट,प्रतापराव तौर यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,पालक,विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके,सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पवार तर आभार प्रदर्शन मच्छिंद्र देवकर यांनी केले.





23 February, 2019

!! शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती येथे 
संत गाडगेबाबा जयंती स्वच्छता अभियान राबवून  साजरी !!    

दि.23 फेब्रुवारी रोजी शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती ता.घनसावंगी जि. जालना येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती स्वच्छता अभियान राबवून साजरी करणयात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून शहादेव नाडे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या  पूजनाने करण्यात आली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा परिचय करून दिला.तर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी संत गाडगेबाबांची शिकवण आचरणात आणावी हीच संत गाडगेबाबा यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगितले.या प्रसंगी सर्व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक या सर्वांनी एक तास श्रमदान करून शालेय परिसर स्वच्छ केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू नागरे यांनी केले तर आभार सुनील खरात यांनी मानले.



20 February, 2019

सार्वजनिक शिवजयंती उत्सव

सार्वजनिक शिवजंयती उत्सव कुं. पिंपळगाव येथे लेझीम सादर करतांना शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय मूर्ती येथील विद्यार्थी व उपस्थित शिक्षकवृंद